English
In maharashtra during the beginning of monsoons in the months of June July you get tender pumpkin leaves in the market .
When I was small we had pumpkin creeper in our backyard . It was a pleasure to go in the garden and gather the tender pumpkin leaves and buds . Yes we do make tasty dish with pumpkin buds too . Will post that recipe also sometime soon .
So today I made this simple yet very healthy and delicious stir fry with pumpkin leaves .
Ingredients :
1 bunch ........................Tender Pumpkin leaves
200 gms ....................pumpkin
2 ..............................onions (finely chopped)
1 tsp........................mustard seeds
3 ..............................green chillies
1 tbsp........................jaggery
२ to 3 ........................dry kokam pieces (sola in konkani)
1 tsp..........................turmeric powder
1 tbsp......................
karwari sambar masala.
2 tbsp.........................oil
salt
Method :
Pick the tender leaves of pumpkin and chop them finely.
Peel the pumpkin and cut it into medium cubes.
Heat oil in a pan and add mustard seeds.
When they splutter add chillies and onions and saute till transparent.
Now add turmeric powder, chopped leaves, jaggery, kokam and salt.
Cook covered with a lid for 10 minutes.
Add the pumpkin pieces and cook further till they are just cooked.
Add sambar masala.
Serve with rotis or daal rice .
मराठी -
पावसाळ्याच्या सुरुवातीला जून जुलै च्या महिन्यात महाराष्ट्रात बाजारात भोपळ्याच्या वेलीची पाने दिसू लागतात .
माझ्या लहानपणी आपल्या मागच्या अंगणात भोपळ्याची वेल होती .
रोज सकाळी जावून वेलीवरची कोवळी पाने , भोपळ्याच्या कळ्या खुडताना खूप मजा वाटायची .
भोपळ्याच्या कळ्यांचे देखील अतिशय चविष्ट पदार्थ बनवले जातात .
त्यांच्याविषयी लवकरच लिहीन .
आज मात्र मी बनवायला अतिशय सोपी पण अतिशय चविष्ट आणि पौष्टिक अशा भोपळ्याच्या पाल्याच्या भाजीची कृती देत आहे .
साहित्य :
१ जुडी - भोपळ्याची कोवळी पाने
२०० ग्राम - लाल भोपळा
२ - कांदे बारीक चिरून
१ टी स्पू - मोहरी
२/३ - हिरव्या मिरच्या
सुपारी एवढा गुळ
२/३ आमसुले
१ टी स्पू - हळद
१ टे स्पू - कारवारी सांबार मसाला
२ टे स्पू - तेल
चवीनुसार मीठ
कृती :
भोपळ्याची कोवळी पाने स्वच्छ धुवून बारीक चिरावीत .
लाल भोपळ्याची साल काढून त्याच्याही मध्यम फोडी कराव्यात .
कढईत तेल गरम करून मोहिरीची फोडणी करावी .
त्यात हिरव्या मिरच्या उभ्या चिरून आणि कांदा घालून सोनेरी होईतो परतावे .
मग हळद , चिरलेली पाने , गुळ , आमसुले आणि मीठ घालावे .
झाकण ठेवून ५ मिनिट भाजी शिजवावी .
मग त्यात भोपळ्याच्या फोडी घालून परत भाजी नीट शिजवावी .
शेवटी सांबार मसाला घालून नीट ढवळून भाजी शेगडीवरून उतरवावी .
चपात्या किंवा डाळ भाता बरोबर हि भाजी खूप छान लागते .