English
We all know that idli is the staple breakfast of most of the South Indian Kitchens . Soft steaming hot idlis never fail to satisfy your hunger and the taste buds too .
I usually try making different types of idlis as the variety appeals the eye and pallete .
Oats and Ragi ( nachani ) both being very nutritious make an ideal combo for the first and most important meal the day .
So why not try using them in our favourite idlis ?
Ingredients :
1 cup - oats
1 cup - nachani flour
1/4 cup - rice flour
1/4 cup - rawa
2 tbsp - curds
१ sachet - eno
salt
Method :
Mix all the above ingredients except eno with just enough water to make thick batter .
Keep the batter aside for half an hour .
Grease the idli mould .
If the batter is very dry add little water and eno and mix well .
Add water in the cooker , keep the idli maker in cooker and cook without pressure for 15/20 minutes.
After 20 minutes take the idli maker out and sprinkle little water on the idlis .
Then remove them with the help of a spoon .
Serve hot with green chutney or any other chutney of your choice.
मराठी
इडली डोसा हे दक्षिणात्य लोकांचे लोकप्रिय पौष्टिक नाश्त्याचे पदार्थ .
मऊ गरमागरम वाफाळत्या लुसलुशीत इडल्या बघून कुणाच्याही तोंडाला पाणि सुटते .
इडली डोसा ह्या पदार्थांचा एक फायदा म्हणजे तुम्ही त्यात आपल्या आवडीनुसार अनेक बदल करू शकता .
एखाद दुसरा जिन्नस जरी बदलला तरी पूर्णपणे नवीन चवीचा स्वादिष्ट पदार्थ तुम्ही आरामात बनवू शकता .
ओट्स आणि नाचणी दोन्ही खूपच पौष्टिक असल्याने हल्ली मधुमेह झालेले आणि वजन वाढलेले आपल्या आहारात त्यांना समाविष्ट करतातच .
पण स्वस्थ निरोगी आयुष्याचे चाहते देखील हल्ली ओट्स नाचणी इत्यादींवर भर देतात .
म्हणून आज ओट्स आणि नाचणी वापरून इडल्या बनवून पहिल्या .
दिसायला जरी थोड्या काळसर तपकिरी रंगाच्या असल्या तरी अगदी मऊ आणि चवीला अप्रतिम झाल्या होत्या .
साहित्य :
१ कप - ओट्स
१ कप - नाचणी पीठ
१/४ कप - तांदळाच पीठ
१/४ कप - रवा
२ टे स्पू - आंबट दही
१ पाकीट - इनो
मीठ चवीनुसार
कृती :
इनो सोडून वरील इतर सर्व साहित्य एकत्र करून थोडं थोडं पाणी घालून इडली साठी करतो तसं जाडसर मिश्रण बनवा .अर्धा तास हे मिश्रण बाजूला झाकून ठेवा.
इडली पात्राला तेलाचा हात लावून घ्या .
मिश्रण जर सुके झाले असेल तर परत थोडे पाणी आणि इनो घालून नीट मिक्स करा .
इडली पात्रात प्रत्येक खळग्यात एक एक चमचा भरून मिश्रण घाला .
कुकर मध्ये पाणी ठेवून त्यात इडली पात्र ठेवावं आणि कुकर ला शिटी लावल्या शिवाय १५/२० मिनिटं विस्तव मोठा करून शिजवा .
२० मिनिटांनी कुकरचं झाकण उघडून इडली पात्र बाहेर काढा आणि इड्ल्यांवर अगदी थोडेसे पाणी शिंपडा .
चमच्याने अलगद इडल्या वेगळ्या करा आणि आपल्या आवडीच्या कोणत्याही चटणी बरोबर सर्व करा .